अल्टकॉइन म्हणजे काय? (What are Altcoins)
अल्टकॉइन म्हणजे काय? बिटकॉइन सोडून इतर blockchain protocol मधील इतर…

Table of Contents
Toggleअल्टकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइन सोडून इतर blockchain protocol मधील इतर सर्व क्रिप्टोकरन्सीजना अल्टकॉइन (Altcoin) म्हणून ओळखले जाते. या अल्टकॉइन्सचा शोध म्हणजे एकूण कॉइन्सचा पुरवठा,त्यांच्या व्यवहाराला मान्यता मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि मायनिंगचे अल्गोरिदम इत्यादी घटकांचे नियमन करत बिटकॉइन प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे विविध प्रयत्नच आहेत.
सर्वसाधारणपणे, अल्टकॉइन्स विकसित करण्यासाठी बिटकॉइनसारखीच पद्धत वापरली जाते, पण त्यात मायनिंगची अधिक चांगली प्रक्रिया, अधिक स्वस्त किंवा वेगवान व्यवहार अशी अनेक सुधारित वैशिष्ट्ये असतात. वेगवेगळ्या अल्टकॉइन्समध्ये काही वैशिष्ट्ये ही सामायिक असू शकतात, मात्र त्यांची एकमेकांशी तुलना केल्यास त्यातून बहुविध पर्याय मिळतात.
आज हजारो अल्टकॉइन्स बिटकॉइनची प्रतिस्पर्धी म्हणून बाजारात उतरली आहेत, पण तरीही बिटकॉइनने आपले सर्वोच्च स्थान अढळ राखले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या जगामध्ये मोठ्या वेगाने बदल होत आहेत आणि गोपनीयता, रक्कमत्वरि ट्रान्सफर होणे आणि पुरावे व्हेरिफाय करण्याच्या नव्या पद्धती यांसारख्या सुधारणा या व्यवहारांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. Litecoin, OKCash, Dogecoin, आणि Zcash अशी अनेक अल्टकॉइन्स लोकप्रिय आहेत.
अल्टकॉइन्सना असलेली मागणी
बिटकॉइन ही आज सर्वोच्च पदावर विराजमान असलेली cryptocurrency आहे. बहुतांश अल्टकॉइन्स ही बिटकॉइन्सच्या प्रतिकृतीच भासतात, पण त्यांत काही फरकही आहेत. यातील काहींच्या व्यवहारात वितरण पद्धती, व्यवहाराचा वेग आणि अल्गोरिदमचे हॅशिंग इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. सगळीच अल्टकॉइन्स काही बाजारपेठेतील चढउतारांमधून फायदा मिळविण्यासाठी घेतलेल्या व्यापारी निर्णयांसाठी शोधली जात नाहीत, तर त्यामागे काही हेतूही असतो.
यातील काही करन्सीज या विशिष्ट प्रश्न सोडविण्यासाठी शोधल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ काही कॉइन्स ही होस्टिंग व डोमेन्स विकत घेण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. काही कॉइन्स ही केवळ प्रौढांसाठीचा कन्टेन्ट मिळविण्यासाठीच वापरली जातात.
खरे तर अल्टकॉइन्स ही केवळ पैसा गोळा करण्यासाठी नव्हे तर विशिष्ट प्रश्न सोडविण्याच्या हेतूनेच विकसित केली जायला हवीत, आणि इतर कॉइन्सनी तयार केलेल्या चाकोरीबाहेर जाऊन त्यांची उपयुक्तता सिद्ध व्हायला हवी. मात्र सध्या बाजारपेठेत काही अल्टकॉइन्स अत्यंत चांगली कामगरी करत आहेत यात निओ, रिपल, इथर इत्यादींचा समावेश आहे.
अल्टकॉइन्सचे प्रकार
जसजशी अल्टकॉइन्सची उत्क्रांती होत गेली तसतसे त्यांचे वेगवेगळे प्रवर्गही तयार झाले असे दिसते. सध्या काही विशिष्ट प्रकारचे अल्टकॉइन्स प्रचलित आहेत व ते स्टेबलकॉइन्स, युटिलिटी टोकन्स, क्रिप्टोकरन्सीज आणि सिक्युरिटी टोकन्स म्हणून उपलब्ध आहेत. या अल्टकॉइन्सना त्यांच्याशी निगडित यातील बहुतांश विचारप्रवाहांपासून अलग करायचे झाले तर एका विशिष्ट पद्धतीच्या हालचालीची गरज भासते. हाच कल पुढेही सुरू राहिला तर येत्या काळात बिटकॉइनचा अपवाद वगळता इतर अल्टकॉइन्स या केवळ मायनिंगवर अवलंबून असलेल्या क्रिप्टोकरन्सीजच्या रूपातच राहतील असे म्हटले जाते.
मायनिंगवर आधारित अल्टकॉइन्स
या अल्टकॉइन्सकडून एक मायनिंग प्रक्रिया पूर्ण केली जाते. यात ब्लॉक्स खुले करून प्रसारित करण्यासाठी काही आव्हानात्मक कोडी सोडवून नवीन कॉइन्स तयार केली जातात. इतर प्रकारच्या अल्टकॉइन्स तुलनेत या अल्टकॉइन्सचे बिटकॉइन्सशी अधिक साधर्म्य दिसते. २०२० सालाच्या सुरुवातीला बहुतांश उच्च दर्जाची अल्टकॉइन्स या गटामध्ये मोडत होती. २०२० च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये इथेरियम हे मायनिंगवर आधारित सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रसिद्ध अल्टकॉइन ठरले होते.
स्टेबलकॉइन्स
बिटकॉइनमधील चंचलपणा किमान पातळीवर आणून त्यात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न स्टेबलकॉइन्सद्वारे केला जातो. प्रचलित चलनांच्या मूल्याच्या आधारे त्यांची मूल्यनिश्चिती करून हा हेतू साध्य केला जातो. अल्टकॉइन्सच्या काही प्रसिद्ध पर्यायांना अमेरिकन डॉलर, सोने आणि युरो यांच्या मूल्याचे पाठबळ लाभले आहे. फेसबुकचे लिब्रा हे सगळ्यात लोकप्रिय स्टेबलकॉइन मानले जाते, मात्र जानेवारी २०२० नंतर त्याची निर्मिती थांबवली गेली.
सिक्युरिटी टोकन्स
ही अल्टकॉइन्स एखाद्या उद्योगसंस्थेशी जोडलेली असतात, पण त्याचबरोबर त्यांची इनिशियल कॉइन ऑफरिंग (ICO) द्वारेही ती उपलब्ध होतात. सिक्युरिटी टोकन्स ही कस्टमरी स्टॉक्ससारखीच असल्याचे म्हटले जाते. खरेतर ही टोकन्स ट्रेडिंगच्या दरम्यान पेआउट किंवा पझेशनसारख्या विशिष्ट प्रकारच्या लाभांची हमी देतात.
युटिलिटी टोकन्स
ही टोकन्स एखाद्या सेवेवरील मालकी देऊ करतात. इतकेच नव्हे तर त्यांना ICO चा एक घटक म्हणून देऊ केले जाते. फाइलकॉइन हे ICO मधून पुरविण्यात येणा–या युटिलिटी टोकनचे एक सुंदर उदाहरण आहे. मध्यवर्ती किंवी वितरीत फाइल्सच्या साठवणुकीच्या संदर्भात फाइलकॉइन्सची अदलाबदल करता येऊ शकते.
Additional Read: Top 10 Altcoins under INR 1 lac
अल्टकॉइन्स आपल्यासाठी गरजेची का आहेत ?
विविधता आणि बदल ही प्रगतीची साधने आहेत याचे भान चांगली समज असलेल्या कोणत्याही गुंतवणुकदाराला असते. गुंतवणुकीच्या प्रचंड शिफारशी देऊ करणा–या मायक्रोकोडवर पूर्णपणे विसंबून न राहण्याविषयी सांगितले जाते. तेव्हा गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि यशस्वी गुंतवणुकीच्या अनेक संधींचा लाभ घेण्यासाठी आपल्या विशिष्ट गरजांनुसार बॉण्ड्स, क्रिप्टोकरन्सी आणि रोख रक्कम यांसारख्या वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांच्या संचामध्ये आपली गुंतवणूककरा. जेव्हा मालमत्तेचे विभाजन अनेक वेगवेगळ्या प्रकारांत केले जाते तेव्हा एखाद्या प्रकारची मालमत्ता तोट्यात गेल्यामुळे होणारे नुकसान फार काळ टिकत नाही. यामुळे गुंतवणुकदाराला जोखमींवर अधिक चांगली पकडही मिळवता येते. वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचे महत्त्व अमान्य करता येणार नाही. क्रिप्टोकरन्सीमधून पैसा मिळवत राहणे सोपे नाही. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदार म्हणून कदाचित आपण सरकारी रोखे किंवा कमीत कमी जोखीम असलेल्या इतर पर्यायांमध्येही गुंतवणूक करून गुंतवणुकीतील धोके कमी कऱण्याचा विचार करू शकता. ढोबळमानाने सांगायचे झाले तर आपल्याला मानवू शकेल इतपत धोका पत्करत प्रत्येक प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यावर तुमच्या गुंतवणूक संचाचा भर असायला हवा. आपली संपूर्ण मालमत्ता रोखीच्या स्वरूपात ठेवण्याचा विचार कोणत्याही प्रकारे शहाणपणाचा ठरू शकत नाही.
गुंतवणूक करताना बिटकॉइन्सपेक्षा अल्टकॉइन्सना अधिक प्राधान्य का दिले जाते…
अल्टकॉइन्स आणि बिटकॉइन्सची तुलना करताना असे दिसून येते की अल्टकॉइन्स हे अधिक स्वस्त आहेत व त्यांच्या मूल्यामध्ये अधिक प्रमाणात चढउतार होत असतात. अल्टकॉइन्स खरोखरच भुरळ पडावी इतकी स्वस्त आहेत!ही कॉइन्स बंद्याऐवजी सुट्ट्या चलनात विकत घेणेही सोपे आणि सुलभ आहे. यातील बहुतांश नाणी खरेतर कवडीमोल आहेत, तरीही या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी काही फार मोठी रक्कम भरावी लागत नाही. शिवाय अधिक सहजतेने वेगळा पर्याय निवडता येतो आणि खूप कमी किंमतीत तुम्ही त्यांची विक्रमी खरेदी करू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे बिटकॉइन्सच्या तुलनेतया अल्टकॉइन्सच्या मूल्यामध्ये सतत मोठे चढउतार होत असतात आणि याच अस्थिरतेचा अधिकाधिक फायदा घेण्याच्या दृष्टीने ट्रेडर्स धोरणात्मक पद्धतीने या कॉइन्समध्ये गुंतवणूक करतात.
Additional Read: Ethereum vs Solana
TOP 10 ALTCOINS BY MARKETCAP
Here are the ten largest crypto tokens by Market Cap, as of 12th May 2022, according to CoinMarketCap:
Coin | Market Cap |
Ethereum | $265,155,859,928 |
Tether | $83,010,299,085 |
BNB | $45,640,494,834 |
USD Coin | $48,784,412,164 |
Solana | $17,546,976,864 |
Cardano | $18,883,766,508 |
XRP | $20,757,923,443 |
Terra | $1,940,499,177 |
Avalanche | $8,653,405,222 |
Polkadot | $8,961,420,930 |